Monday, April 2, 2018

सीताफळाची आदर्श लागवड आणि व्यवस्थापन असे करावे

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे.
सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्‍याची सिताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात असा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो.  मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्‍द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्‍हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्‍हे आणि खंडाळा फलटण तालुक्‍यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्‍वी गवडीतून नावारूपाला येऊ लागला आहे. महाराष्‍ट्रात सन 1989-90 पर्यंत कोरडवाहू फळझाडाखाली एकूण 242100 हेक्‍टर क्षेत्र असताना त्‍यापैकी एकटया सिताफळाखाली 2800 हेक्‍टर क्षेत्र यशस्‍वी लागवडीची ग्‍वाही देणारे ठरले आहे. सन 1990 – 91 पासून सुरु झालेल्‍या रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्‍पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्‍या लागवडीस सिताफळाचा समावचेश करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे सिताफळ लागवड ही शेतकरी बांधवांना चालून आलेली एक संधी आहे. महाराष्‍ट्रात सन 1990-91 पासून या योजनेअंतर्गत सिताफळाची यशस्‍वी लागवड 25906 हेक्‍टर क्षेत्रावर करण्‍यात आलेली आहे.
सिताफळ हेक्‍टरी अतिशय काटक फळझाड असून त्‍याचे लागवडीकडे अद्यापही शास्‍त्रीय दृष्‍टीने लक्ष देण्‍यात आलेले नाही. सिताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्‍हणून कोणत्‍याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्‍ये कुंपणाच्‍या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशिर ठरते. त्‍याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्‍याची जागा, नदीकाठची जमीन, शेताचे बांध, माळराने, डोंगर उताराच्‍या जमिनी अशा वेगवेगळया प्रकारच्‍या जमिनीमध्‍ये या पिकाची लागवड करता येते.
औषधी उपयोग -
 सिताफळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असून बर्‍याच पोटदुखीच्या विकारामध्ये या फळांचा उपयोग केल्यास निश्चितच फरक पडतो. सिताफळाच्या झाडांची पाने, साल, मुळ, बियाया सर्वाचाच उपयोग अनेक कारणांसाठी होत असल्याने सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात करणे फायदेशीर आहे.

फळांचा उपयोग रक्तशुद्धीसाठी (टॉंनिक) म्हणून तसेच खोकला, सर्दी, पोटाचे विकार, पित्त, हगवण व क्षय रोगांस प्रतिबंधक म्हणून होतो. सिताफळापासून तयार केलेले सिताफळसव या औषधाचे सेवन वर्षभर नियमित केल्यास क्षयरोग व हगवणींचा विकार असलेल्या व्यक्तीस हमखास फरक पडतो. सिताफळाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग शौचास त्रास किंवा व्यवस्थित होत नसल्यास केला जातो, तर पानांचा उपयोग मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तिस साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी आहे.

सिताफळाचे उपयोग

सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्‍याचे सरबत करतात. सिताफळामध्‍ये खनिजद्रव्‍ये आणि जीवनसत्‍वे उपलब्‍ध करून देण्‍याची चांगली क्षमता असल्‍यामुळे ते एक पुरक अन्‍न आहे. सिताफळाच्‍या ताज्या 100 ग्रॅम गरात पुढीलप्रमाणे अन्‍नघटक द्रव्‍यांचा समावेश होतो.
अ. क्र.घटक द्रव्‍येशेकडा प्रमाण
1.पाणी73.30
2.प्रथिने1.60
3.खनिजे0.70
4.पिष्‍टमय पदार्थ23.50
5.चुना0.20
6.स्‍फुरद0.47
7.लोह1.00
सिताफळाच्‍या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.  पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात. सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. तो एक छोटासा कुटिर उद्योग घरबसल्‍या महिलांना करण्‍यासारखा आहे. सिताफळाची मोठी झाडे जूनी झाली म्‍हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेडयावाकडया टणक वाळलेल्‍या फळांची कुटून बारीक पावडर करून ती कातडी कमविण्‍याच्‍या धंदयात देखिल वापरात आणता येते.
सिताफळाची लागवड शास्‍त्रीय दृष्‍टया  पुढिलप्रमाणे करता येते.

हवामान व जमीन

महाराष्‍ट्रातील  हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्‍यास भरपूर वाव आहे. अत्‍यंत कोरडया रखरखीत व उष्‍ण हवामानाच्‍या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्‍या हवामाना पर्यंतच्‍या प्रदेशात सिताफळ वाढते. मात्र उष्‍ण व कोरडया हवामानातील सिताफळे चविला गोड आणि उत्‍कृष्‍ट दर्जाची गुणवत्‍तेच्‍या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. कोकणासारख्‍या जास्‍त दमटपणा असलेल्‍या भागाताही हे झाड वाढते. पण अशा हवामानात तेथील फळे आकाराने लहान येतो. आकाराने लहान असलेले हे फळझाड दमट हवामानामध्‍ये नेहमी हिरवेागर राहते. कमी पावसाच्‍या प्रदेशामध्‍ये डिसेंबर ते फेब्रूवारी  या काळात त्‍याची पान गळती होऊन झाडे विश्रांती घेतात. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही. थंड हवामानामध्‍ये फळे घट्ट व टणक राहून पिकत नाहीत. मोहोराच्‍या काळात कोरडी हवा आवश्‍यक असते. पावसाळा सुरु झाल्‍याखेरीज झाडांना फलधारणा होत नाही. सिताफळाचे झाड अवर्षणाला उत्‍तम प्रतिसाद देत असले तरी अति-अवर्षण मात्र या झाडाला अपायकारक ठरते. साधारणपणे झाडाच्‍या वाढीसाठी 500 ते 750 मिमि पाऊस आवश्‍यक असतो.
सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्‍त भागासाठी शिफारस केली असल्‍यामुळे हेक्‍टरी फळझाड कोणत्‍याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्‍दा सिताफळाचे झाड वाढू शकते. अत्‍यंत हलक्‍या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्‍त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्‍तृत प्रकारच्‍या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमिनी या फळझाडाला अयोग्‍य ठरतात.

जाती

सिताफळाच्‍या 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. अधिक उत्‍पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर ही मोठया फळाची चांगल्‍या गराची (48 टक्‍के ) जात असून आपल्‍या हवामानात आणि जमिनीत चांगली येते. अर्का सहान, अॅनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्‍स, पिंक बुलक्‍स हाई, अॅर्टिमोया वॉशिंग्‍टन 10705, वॉशिंग्‍टन 98787 इ. जाती आहेत.
१) लाल सिताफळ : या सिताफळाची झाडे कमी उंचीची असून पाने लहान असून मधली शीर जांभळट रंगाची असते. एका झाडापासून ५० ते ७५ फळे मिळतात. फळामध्ये बियांचे प्रमाण जास्त असून गर रंगाने गुलाबी व साधारण चवीचा असतो. फळ बाहेरून लालसर जांभळ्या रंगाचे दिसते. मुंबई मार्केटला गुजराती समाजाचे लोक या वाणाची खरेदी करतात. त्यमुळे बाजारभाव चांगला मिळत असल्याने थेट हैद्राबादहून ही फळे मुंबईला येतात.

२) बिटीश गियाना : उत्पादनाच्या दृष्टीने ह्या जातीच्या झाडांपासून फळे भरपूर मिळतात. फुलापासून फलधारणा जादा होते. फळे आकर्षक १७५ ते २०० ग्रॅम वजनाची असून आकार मध्यम असतो. फळांमध्ये गर कमी व बी जास्त असते.

३) मेमॉब : फळे लंबोळ्या आकाराची असून फळ फोडले असता फोडी रुंद, गोल असतात. चव, स्वाद अप्रतिम असल्याने तसेच बियांचे प्रमाण कमी असल्याने फळांना मागणी भरपूर आहे. एका झाडावर ८० ते १०० फळे लागतात. फळे दरवर्षी, नियमित लागतात. फळे वजनाने हलकी साधारण १८० ते १९० ग्रॅमची असतात.

४) वॉशिग्टन (१०७००५) : या वाणाची लागवड महाराष्ट्रात फारच कमी आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात ह्या वाणाची झाडे पाहायला मिळतात. फळे आकाराने लहान १६५ ग्रॅम वजनाची असतात. गर लोण्यासारखा मऊ, पिवळसर छटा असलेला दिसतो.

५) बाळानगर : ही जात मुळची हैद्राबादजवळ बाळानगर भागातली. या वाणाच्या बियापासून रोपे महाराष्ट्रात १० ते १५ वर्षापासून शासनामार्फत वाटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाळानगर वाणाच्याच सिताफळाच्या बागा दिसतात. ह्या फळाचा आकार मोठा, होळे मोठे आहेत. फळामध्ये बी कमी व गर जादा असतो. गराची चव अतिशय चांगली आहे. गरात साखरेचे प्रमाण साधारण असल्याने टिकाऊपणा जास्त आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये ह्या वाणाचा गर वापरला जातो. इतर वाणांपेक्षा या सिताफळाला बाजारभाव चांगली मिळतो.

सुधारीत जाती

महाराष्‍ट्रात सिताफळाच्‍या नामवंत प्रचलित जाती बहूधा संशोधनातून विकसित झालेल्‍या नाहीत. आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ हया जाती उत्‍पादन व दर्जाचे दृष्‍टीने चांगल्‍या आढळून आलेल्‍या आहेत. वॉशिंग्‍टन पी-1, बारबाडोस या सुध्‍दा सुधारित जाती विकसित केलेल्‍या आहेत.

अभिवृध्‍दी

सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने बियांपासून रोपे तयार करून केली जाते. ताजे बी तीन दिवस पाण्‍यात भिजून घालून नंतर पेरावे. रोप गादीवाफयावर किंवा पॉलिथीनच्‍या पिशवीत तयार करून पावसाळयामध्‍ये शेतात कायमच्‍या जागी लावावीत. ही रोपे पावसाळा संपल्‍यानंतर एकदा जगली की नंतर अवर्षणाला तोंड देत वाढू शकतात. सिताफळाचे डोळे भरून किंवा मृदुकाष्‍ट कलम सुध्दा करतात. कलमे करण्‍यासाठी स्‍थानिक सिताफळाचे खुंटाचा वापर करता येतो. त्‍याचप्रमाणे सिताफळाची अभिवृध्‍दी छाटे वापरून देखिल करता येते. मात्र छाटयांची अभिवृध्‍दी सहजासहजी होत नाही. छाटे घेण्‍यापूर्वी फांद्या जमिनीत गाडून नंतर त्‍या फांदयाची छाटे घेवून त्‍यांना 5000 पीपीएम एन ए ए चा वापर करून अतिसुक्ष्‍म तुषारगृहामध्‍ये ठेवल्‍यास छाटयांना मुळया फूटतात. सिताफळाच्‍या अभिवृध्‍दीसाठी डोळे भरणे, मृदकाष्‍ट आणि भेट कलम याव्‍दारे छाटयांपेक्षा अधिक यश मिळते.

लागवड

सिताफळाच्‍या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी मे महिन्‍यात 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खडडे जमिनीचा मगदुर पाहून घ्‍यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्‍यावेत.  5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्‍यास हेक्‍टरी 400 झाडे बसतात. हेक्‍टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्‍फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरण्‍यात यावे. यासाठी हेक्‍टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेटची आवश्‍यकता आहे. अशा प्रकारे खडडे भरल्‍यानंतर झाडाची लागवड पावसाळयात करावी.

खते

सिताफळाच्‍या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत. परंतु मोठे फळ व चांगले उत्‍पन्‍न येण्‍यासाठी पावसाळा सुरु झाल्‍याबरोबर प्रत्‍येक झाडाला  2 ते 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत देणे योग्‍य ठरते. तसेच पहिल्‍या 3 वर्षापर्यंत प्रत्‍येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.
वर्षनत्र (ग्रॅम)स्‍फूरद (ग्रॅम)पालाश (ग्रॅम)
1125125125
2250250250
3375250250
5 वर्षापुढील प्रत्‍येक झाडाला 5 ते 7 पाटया शेणखत किंवा कंपोस्‍ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.

पाणीपुरवठा

सिताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्‍याने वरच्‍या पाण्‍याशिवाय वाढू शकते. सिताफळाच्‍या पिकाला नियमित पाण्‍याची आवश्‍यकता नसते. निव्‍वळ पावसाच्‍या पाण्‍यावरही चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्‍हाळयात पाणी दिल्‍यास झाडांची वाढ चांगली होते. त्‍याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया दिल्‍यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

बागेची निगा

  • सिताफळाची रोपे लावल्‍यानंतर काही रोपे मेली असतील तर महिन्‍याचे आत नांग्‍या भरून घ्‍याव्‍यात. तसे शक्‍य न झाल्‍यास पुढील वर्षी जून महिन्‍यापूर्वी नांग्‍या भराव्‍यात.
  • खुरपणी करून बागेतील तण काढावेत.
  • रोपे लहान असताना पावसाचा ताण पडल्‍यास मधून मधून पाणी द्यावे.
  • झाडाची वाढ जोमाने होण्‍याकरिता व चांगले फळ मिळण्‍याकरिता छाटणी करावी. छाटणी करताना झाडाला योग्‍य वळण सुरुवातीच्‍या वाढीच्‍या काळात द्यावे. त्‍यासाठी झाडावरील अनावश्‍यक फांद्या काढून टाकाव्‍यात.
  • पावसाचा ताण जास्‍त पडल्‍यास 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.
  • बागेमध्‍ये वेळोवेळी आंतर मशागत करावी.

आंतरपिके

सिताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्‍यात जमिनीच्‍या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्‍यादी पिके घेता येतात.

बहार धरणे

बहार धरण्‍याच्‍या तंत्रांत पाणी तोडण्‍याची पनध्‍दत प्रथम विचारात घ्‍यावी. ताण देण्‍याचा काळ हा जमिनीच्‍या प्रतीनुसार आणि झाडांच्‍या वयोमानानुसार
कमी जास्‍त होऊ शकतो. विश्रांतीचा काळ बहार येण्‍यापूर्वीच हलक्‍या जमिनीत 35 ते 40 दिवस मध्‍यम भारी जमिनी 45 ते 55 दिवस अतिभारी जमिनीत 60 ते 70 दिवस ठेवावा. सर्वसाधारणपणे झाडांची 35 ते 50 टक्‍के पानगळ झाल्‍यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे.
ताण सुरु करण्‍यापूर्वी अगोदरच्‍या बहाराची सर्व फळे झाडावरून उतरवून घेणे गरजेचे असते. ताण देण्‍यापूर्वीच आवश्‍यक फळे, फूले, वाळलेली फळे झाडावर असल्‍यास ती काढून टाकावीत. त्‍यानंतर बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर बंद करावे.
कीड - पिठ्या ढेकूण (मिली बग ) : ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यांतून रस शोषून घेते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्यांची आणि फळांची गळ होते. सिताफळाच्या फळांची वाढ होत असताना पृष्ठभागांच्या भेगांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड फळातील रस शोषून घेते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीच्या अंगावर लोकरी माव्यासारखे पांढरे आवरण असल्याने फवारणी केलेले औषध किडीपर्यंत पोहचत नाही.
नियंत्रण : जून - जुलै महिन्यात या किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. अशा वेळी १५ ते २० सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिकची पट्टी घेऊन त्याला ग्रीस लावावे. हि पट्टी ग्रीस वरच्या बाजूला लावून सर्व्ह बाजूंनी बांधून घ्यावी, त्यामुळे खालून वर चढणारे किडे ग्रीसला चिकटून मरून जातात.

रोग :
१) सिताफळे कडक पडणे (स्टोन फ्रुटस) :या विकृतीमध्ये सिताफळाच्या फळांची पूर्ण वाढ होत नाही. फळे आकाराने लहान राहतात., कडक होतात आणि त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो. ही फळे, इतर फळांची काढणी पूर्ण होऊन झाड सुप्तावस्थेत गेल्यानंतरही झाडावर तशीच राहतात. फळवाढीच्या काळात ही फळे अन्नरसासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे अन्नरसाचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती निर्माण होते.
२) सिताफळे काळी पडणे :
 सिताफळे ज्यावेळेस कैरीएवढी असतात या काळात जर हवेत आर्द्रता व संततधार पाऊस पडत असेल तेव्हा देठाजवळील खोलगट भागात पाणी साचून तेथील पेशी कुजू लागतात, बुरशी दिसते. याचे प्रमाण वाढत जाऊन सिताफळाचा बराचसा भाग काळा पडतो. प्रथमत: हे तपकिरी डागासारखे दिसून नंतर पूर्ण फळ काळे होऊ लागते. दुसरे कारण म्हणजे जर सिताफळाची बाग भारी काळ्या जमिनीत असेल. पाण्याचा निचर व्यवस्थित होत नसेल तेव्हा, तसेच बागेत स्वच्छता नसल्यास (तण वाढल्यास) हा प्रादुर्भाव होतो.

काढणी, प्रतवारी, पॅकिंग व साठवण

सिताफळामध्‍ये डोळे उघडणे ही क्रिया पूर्ण झाली म्‍हणजे झाडावरची फळे उतरविण्‍यास काही हरकत नाही. बहूदा सिताफळाची लागवड केल्‍यापासून 5 ते 6 वर्षानी फळे मिळू लागतात. कलमे केलेल्‍या झाडांना 3 ते 4 वर्षात फळे लागण्‍यास सुरुवात होते. सिताफळांच्‍या झाडांना जून, जूलै मध्‍ये फूले येण्‍यास सुरुवात होते. फूले आल्‍यावर फळे तयार होण्‍यास सर्वसाधारणपणे 5 महिन्‍यांचा कालावधी लागतो. फळे सप्‍टेबर ते नोव्‍हेबर मध्‍ये तयार होतात. आणि दसरा, दिवाळीच्‍या सुमारास सिताफळे बाजारात येतात. शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे सिताफळाच्‍या बहरात फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणीसाठी ग्राहय धरावेत अशा वेळी फळांचे खवले (कडा) उकलू लागल्‍या व आतील दुधाळ भाग किंचित दिसू लागला की फळे तयार झाली असे समजून फळांची काढणी करावी.
प्रतवारीसाठी पाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत. मोठी व आकर्षक फळे निवड करून अ ग्रेड ची म्‍हणून बाजूला काढावीत. फळे मध्‍यम आकाराची असल्‍यास ती ब ग्रेड ची म्‍हणून निवडावीत आणि राहिलेली लहान सहान फळे ही क ग्रेडची म्‍हणून समजावीत.
स्‍थानिक बाजारपेठांकरिता जर माल पाठवायचा असेल तर उपलब्‍धतेनुसार बांबूच्‍या करंडयात खालीवर कडूलिंबाचा पाला घालून त्‍यात फळे व्‍यवस्थित भरावीत व फळे विक्रीसाठी तयार झालेली वेडयावाकडया आकाराची फळे शक्‍यतो अगदी जवळच्‍या स्‍थानिक बाजारात त्‍वरीत विकून टाकावीत.
सिताफळ हेक्‍टरी जास्‍त नाशवंत फळ असल्‍यामुळे ते जास्‍त दिवस साठविता येत नाही. शितगृहातसुध्‍दा सिताफळ जास्‍त दिवस ठेवता येत नाहीत आणि समजा मोठया प्रमाणात व्‍यापारी तत्‍वावर उत्‍पादन करणा-या या शेतकरी बांधवांनी सामुहीकपणे शितगृहाची व्‍यवस्‍था उपलब्‍ध केल्‍यास या फळासाठी शितगृहातील साठवणूकीचे तापमान 39 ते 42 फॅरनहिटस तर आर्द्रता 45 ते 90 टक्‍के राखावयास हवी. असे झाल्‍यास साठवणूकीचा कालावधी 5 ते 6 आठवडे राहतो.
फळांची काढणी व उत्पादन : 
सिताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात, तर बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळे लागतात. जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते. सर्वसाधारणपणे ६ ते ७ वर्षे वयाच्या झाडाला १०० ते १५० फळे येतात.

सिताफळाच्या झाडांना जून - जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे ५ महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात.

सिताफळाची योग्य वेळी काढणी करावी. पक्क सिताफळे झाडावर जास्त काळ राहू दिल्यास फळांना तडे पडतात आणि फळे कुजू लागतात. स्थानिक जातीच्या सिताफळाचे दोन प्रकार आढळतात. एका प्रकारच्या सिताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि आतील गर पिवळसर रंगाचा असतो, तर दुसऱ्या प्रकारच्या सिताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि गर पांढर्‍या रंगाचा असतो. यापैकी पिवळसर गर आलेले सिताफळ उत्कृष्ट समजले जाते. सिताफळाच्या फळांचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांची काढणी केल्यानंतर फळे ३ -४ दिवसांत नरम पडून खाण्यायोग्य होतात. सिताफळाची फळे नशावंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणूनच काढणीनंतर शक्य तितक्या लवकर फळांची विक्री करावी.
मार्केट : 
सिताफळांस ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून दूरच्या बाजारपेठेत पाठवितान मार्केटचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच झाडावरून फळे पक्क होण्याच्या थोडे अगोदर काढणी करून बाजारपेठेत ताबडतोब पाठवावी. कारण सिताफळ हे नाशवंत असल्याने जास्त दिवसे ठेवल्यास खराब होतात. मुंबई मार्केटमध्ये मोठ्या सिताफळास ७० ते १०० रू. ६ नग असा भाव मिळतो.

सिताफळाला दसरा दिवाळीत बाजारभाव कमी असतात. मात्र गौरी गणपती, महाशिवरात्रीला भाव चांगले असतात. मुंबई मार्केटला किंग साईज १ नंबर ४ ते ६ फळांना १०० ते १५० रू., २ नंबर १२ फळांना ८० ते ९० रू., ३ नंबर १५ ते १८ फळांना ४० ते ६० रू. ४ नंबर २४ ते ३० फळांना ३० ते ४० रू. दर मिळतो.

निर्यात : सिताफळाच्या निर्यातीस मध्य पूर्व युरोपीय देशांमध्ये, आखाती देशांत चांगले मार्केट असून जर्मनी, इंग्लंड देशामध्ये सिताफळ निर्यात होते.

चांगले सिताफळ कसे ओळखावे: सिताफळाचा आकर गोलाकार अंडाकृती व मोठा असल्यास डोळे व बिया भरपूर असल्यास अशा सिताफळांमध्ये गराचे प्रमाण कमी असते. तसेच लवकर खराब होतात. अशा सिताफळांना दूरच्या मार्केटमध्ये कमी भाव मिळतो.

सिताफळाचा आकार हृदयासारखा आणि डोळे व बिया कमी परंतु लांबट, मोठ्या असल्यास अशी सिताफळे जास्त दिवस टिकतात. तसेच गराचे प्रमाण जास्त असून चवीला मधूर, गोड असतात व अशा सिताफळांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाळानगरमध्ये अशा सिताफळांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बाळानगर ह्याच नावाने ही जात संबोधली जाते. ह्या सिताफळाची लागवड बाळानगर, हैद्राबाद, संगारेड्डी, दौलताबाद, औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात केली जाते.

काही वेड्यावाकड्या आकाराची फळे हिरवट रंगाची असून हे स्थानिक वाण परिंचे खंडाळा (सातारा ) डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. उकळत नसल्यामुळे तसेच अशा सिताफळांवर पांढरी बुरशी असते व त्यामध्ये अळी दिसते. त्यामुळे अशा फळांना मार्केटमध्ये कमी भाव मिळतो. सिताफळांच्या बियांचा आकार हा जाड, आखूड बोथट व रंग काळा किंवा करडा असल्यास गर भरपूर व अतिगोड, चिवट, घट्ट व सिलीकाचे प्रमाण जास्त असलेला तसेच अधिक शर्करायुक्त असून अशी सिताफळे आरोग्यवर्धक व बलवर्धक असतात. याउलट सिताफळांच्या बियांचा आकार लांबट असल्यास गर कातड्यासारखा चिवट व च्युईंगमसारखा चिकट, पातळ असतो, गराचे प्रमाण कमी असते, गर चवीस साधारण असतो. रासायनिक खते व किटकनाशके यांचा दुष्परिणाम जमिनीत व मानवास आज जाणवत आहेतच व काही काळानंतर ह्या रासायनिक खते व किटकनाशके यांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांना तोंड देणे अवघड होणार आहे. याची काही प्रगतीशील शेतकऱ्यांना जाणीव होऊन नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग करू लागले आहेत. नैसर्गिक, आयुर्वेदिक वनस्पतीजन्य किटकनाशके नामवंत शास्त्रज्ञांनी निर्माण केली आहेत. निरनिराळ्या उपयुक्त वनस्पतींपासून आपण विविध किटकनाशके निर्माण करू शकलो तर ते नक्कीच मानवाला वरदान ठरणारे आहे.

प्रक्रिया

सिताफळाचे मार्मालेड व जॅम बनवितात. डबाबंद सिताफळ (कॅनिंग) घरगुती आणि व्‍यापारी तत्‍वावर करणे, शितपेय गृहउद्योगात आईस्क्रिम बनविण्‍यासाठी सिताफळाची भूकटी (कस्‍टर्ड पाऊडर) इत्‍यादी सिताफळ प्रक्रियांना देखील बराच वाव आहे.
महत्त्वाचे : सिताफळांच्या पानांपासून व बियांपासून किफायतशीर नैसर्गिक किटकनाशक तयार करता येईल का ते प्रत्यक्ष प्रयोग करून पहावे. स्त्रियांच्या केसातील उवा, लिखा घालविण्यासाठी सिताफळांच्या पानांचा व बियांचा ठेचून केलेला काढा हे प्रभावी उवानाशक महणून सिद्ध झालेले आहे. याला निर्यातयोग्य मार्केट आफ्रिकेसारख्या उष्ण प्रदेशातील देशांमध्ये मिळू शकेल. तसेच याचा ढेकून, कोळी (माईटस) यावर उपाय करता येईल का ? यावरती संशोधन होणे शक्य आहे.

Thursday, February 22, 2018

चंदन: एकरी कोटींमध्ये उत्पन्न देणारे एकमेव झाड


चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा - समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस - जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण १ ते ६% असते. 

चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते. 

चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियांपासून रोपे तयार केली जातात. याशिवाय बियाचा वापर उद्योगधंद्यामध्ये करतात. बियापासून ५० ते ६०% पर्यंत सुकणारे कोरडे तेल (ड्राईंग ऑईल) मिळते. ते इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी उद्योगात वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. 
                                                     चंदनाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
रोपे तयार करणे : चंदनाचे बी लागवडीनात्णार बियांभोवती असणाऱ्या कठीण कवचास तडा देऊन कोंब बाहेर येतो. बियाचे टरफल कालांतराने पडून जाते किंवा सुकते. लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. 
२ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही. 

गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत : गादीवाफे २ प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे १० मिटर x १ मीटर आकाराचे करून १५ सेंमी उंची ठेवावी. यामध्ये लालमाती व चाळलेली वाळू २:१ प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले ४ किलो बी पसरून घेऊन त्यावर २ सेंमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट ५०%) करावी. 

बी उगविल्यानंतर गवताचे अच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर - जानेवारीत पेरावे. 

पिशवीत रोपे लावणे : बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर २५ ते ३० दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. 
साधारणपणे ६ ते ८ आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकवी व रोपांच्या पिशव्या अधून मधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. ६ ते ८ महिन्यामध्ये रोपे २५ ते ३० सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडीयोग्य उपलब्ध होतात.
१ किलो बियापासून साधारणपणे २००० रोपे तयार होतात. 
                                                  चंदनाची पिशवीतील  रोपे 
लागवड: मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्टमध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १६' x १२' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर ने  भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते. 
चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत 'शर्विलक' म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. यजमान झाड नसेल तर चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड २ - ३ वर्षांनी मरते. 
                                                      यजमान वृक्ष आणि चंदन 
यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा , लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, अकेशिया, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, अंकोल, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते. 

यजमान मध्यम आयुषी झाडे : यामध्ये हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, पांगारा, बकुळ, कुंचला, बारतोंडी इ. 

यजमान फळझाडे : सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर. 

यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.

अभ्यासाअंती असे समजते की, यजमान वृक्ष म्हणून सुरू, करंज, शिरीष, काशिद, साग, सिसम हे वृक्ष चंदनास योग्य/उत्तम समजली गेली आहेत. तर फळझाडांमध्ये आवळा, बोर, सिताफळ, डाळींब आणि मध्यम आयुषी झाडांमध्ये शेवरी, हादगा, पांगारा, शेवगा हे वृक्ष योग्य ठरतात. 

आंतरपीक :
चंदनातील आंतरपीक 
 चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान १० फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले ४ - ५ वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी , काळमेघ, भुई रिंगणी, शतावरी, कोरपड, अशी पिके घेता येतात. 

जमीन: लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त अशी कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंतु उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते. चंदनाचा गाभा आणि त्यापासून निघणारे तेल हे एक आर्थिककदृष्ट्या महत्त्वाचे उत्पादन आहे. अभ्यासाअंती असे लक्षात येते की खडकाळ, दगडयुक्त व कोरड्या भागातील चंदनापासून मिळणारे तेलाचे प्रमाण हे सुपीक जमिनीपासून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलापेक्षा अधिक असते. परंतु दोन्ही प्रकारच्या जमिनीतून मिळणाऱ्या चंदनाच्या तेलाची गुणवत्ता सारखीच आढळते. 

हवामान : चंदनाने झाड हे ६०० ते १६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ डी ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते. 

पाणी: चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून २ वेळा पाणी ठिबकने द्यावे. 

चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून २ वेळा तरी पाणी द्यावे.

रोग कीड : चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक अथवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु जंगलातील जुनाट झाडांवर स्पाईक रोग मायक्रोप्लाझमा सदृश्य जिवाणूपासून झाल्याचा आढळून आला आहे. किडीमध्ये मुंगे हे रात्री पानांच्या कडा कुरतडत मधल्या शिरेकडे खात जातात. हे किडे पानांच्या खालच्या बाजूस अथवा पानाच्या गुंडाळीत अथवा जाळे बनवलेल्या पानात दिवसा आढळतात. त्याचबरोबर रस शोषणारी अळी, खोडपोखरणारी अळी, वाळवी या किडींचा प्रादुर्भाव चंदनावर आढळून येतो.  प्रादुर्भाव झाल्यावर नुकसानीची पातळी ओलांडण्यापुर्वी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र सतत रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. म्हणजे त्याचा चंदनाच्या गाभा व तेलच्या दर्जावर परिणाम होणार नाही. 

चंदनाचा गाभा : चंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल मिळते. सुगंधी गाभा हा तुरट, कडू, ताप निवारक, थंड, उल्हासित, कडक, जड, टिकाऊ, मधुर आणी तिव्र वासाचे, दोष विरहीत पिवळसर अथवा तपकिरी रंगाचे, सरळ घट्ट दाणेदार व एक साच्याचे तंतुमय तेलकट गाठी विरहीत असतो. फिक्या रंगाच्या गाभ्यामध्ये गडद रंगाच्या गाभ्यापेक्षा तेलाचे प्रमाण जास्त असते. चंदन तेलाचे प्रमाण १० वर्षापेक्षा जास्त वयाच्या झाडात ०.२ ते २%, तर परिपक्व झाडात २.८ ते ५.६% असते. मुळापासून शेंड्याकडे ४५% पर्यंत तेलाचे प्रमाण कमी होत जाते तर गाभ्याच्या मध्यबिंदूपासून ते बाह्य भागापर्यंत २०% पर्यंत कमी होत जाते. 

गाभा तयार होण्याचे काम ४ वर्षाच्या पुढे सुरू होते. तर नैसर्गिक रित्या ते ७ वर्षाच्या पुढे होते. १२ ते १५ वर्षात १२ ते १५ सेंमी व्यासाच्या वृक्षापासून १५ ते २५ किलो सुगंधी गाभा मिळू शकतो. 
                                                               चंदनाचा गाभा 
गाभ्यापासून तेल: गाभ्याच्या पावडरवर वाफेच्या उर्ध्व पतनाची क्रिया करून तेल काढले जाते. त्यास जगभर 'इस्ट इंडियन सँडलवूड ऑईल' या नावाने ओळखले जाते. बाह्य लाकडा पासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरम गोट्या (कॉईन) बनविल्या जातात. तर ताज्या पानांपासून फिक्कट पिवळे मेण मिळते. 

उत्पन्न : चंदनाचे उत्पन्न हे झाडांची संख्या झाड विक्री पर्यंत किती राहते यावर अवलंबून आहे .तसेच त्यावेळी असणारा बाजारभाव देखील महत्वाचा आहे . झाडाचे वय जेवढे जास्त तेवढेच त्यापासून मिळणारे लाकडाचे प्रमाण जास्त . एका झाडापासून १५ वर्षात १५ किलो जरी लाकूड मिळाले तरी त्याचे ६००० रु  प्रती किलोने ९०००० रु होतात. एकरी संरक्षणाचा खर्च वगळता कोटींमध्ये उत्पन्न आपल्याला मिळू शकते 
चंदन झाडांना संरक्षणसाठी तारेचे कुंपण 

Sunday, February 18, 2018

कापूस लागवडी विषयी माहिती



कापूस

कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक असून २०१२-२०१३ मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के (४१.४६ लाख हेक्टर) इतके आहे. तथापी, कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता (४९६ कि/हे) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (३०५ कि) कमी आहे. राज्यामध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी. वाणाची लागवड झाली होती.

उन्हाळी बागायती कपाशी

कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते.
कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.
कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत वा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात मिसळावे. ९० सें.मी. अंतरावर उथळ स-या पाडाव्यात, उथळ स-यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद स-यांमुळे झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची कायिक, शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरुरीपेक्षा जास्त दिले जाते. स-यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी.

पेरणीतील अंतर




उन्हाळी बागायती कपाशीमध्ये पेरणीचे अंतर ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. कपाशीच्या दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतरावर कपाशीच्या दर हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असून त्यासाठी पुढील प्रमाणे अंतर ठेवावे. वाणाचा प्रकार
वाणाचा प्रकार
पेरणीचे अंतर (सें.मी)
हेक्टरी झाडांची संख्या
एकरी झाडांची संख्या
  1. सुधारित
९० X ६०
  • ,५१८
  • ,४०७
  1. संकरित
अमेरिकन X अमेरिकन
९० X ९०
  • ,३४५
  • ,९३८
अमेरिकन X इजिप्शियन
९० X १२०
  • ,२५९
  • ,७०३


पेरणीसाठी वाणांची निवड

बागायती कपाशीसाठी सुधारित/संकरित वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी तसेच बियाणे प्रमाणीत असल्याची खात्री करुनच विकत घ्यावे. उन्हाळी हंगामात दख्खन कालवे विभागात लागवडीसाठी पुढील वाणांचाच वापर करावा.
वाण
कालावधी (दिवस)
उत्पादन (क्वि./हे.)
रुईचा उतारा (टक्के)
धाग्याची लांबी (मि.मी)
हेक्टरी बियाणे (किलो)
शिफारस केलेले जिल्हे
सुधारित वाण अ) अमेरिकन
१.एलआरए ५१६६
१६०-१७०
२०-२२
३५-३६
२६-२७
७-८
कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
२.जेएलएच - १६८
१५०-१६०
१५-२०
३५-३६
२६-२७
७-८
महाराष्ट्रातील खानदेश विभाग
३.फुले ६८८
१५०-१६०
२२-२५
३७
२६-२७
७-८
महाराष्ट्रातील दख्खन कालवे विभाग
संकरित वाण अ) अमेरिकन X अमेरिकन
१.एच -१०
१६०-१७०
२५-२८
३६-३७
२६-२७
२.५-३
कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
ब) अमेरिकन X इजिप्शियन
१.डीसीएच-३२
१८०-१९०
१२-१५
३२-३३
३४-३५
२.५-३
सांगली, सातारा, सोलापूर
२.फुले -३८८
१७०-१७५
१५-२०
३३-३४
३४-३५
२.५-३
सांगली, सातारा, सोलापूर

महाराष्ट्रातील शिफारशीत निवडक बीटी संकरित कापूस वाण
  1. अमेरिकन X अमेरिकन
कंपनीचे नाव/संस्थेचे नाव
बी.टी.संकरित वाण
राशी सीड्स, अतूर, तामिळनाडू
राशी-२, शक्ती-९, साई, राशी- ६५६
अंकूर सीडस् नागपूर
अंकुर ०९, अंकुर ६५१, जय
महिको सीडस्, जालना
एमआरसी – ७३२६, एमआरसी – ७३५१
अजित सीडस्, औरंगाबाद
अजित -११, अजित-१५५, अजित-१७७, अजित १९९
कृषिधन सीडस्, जालना
केडीसीएच-४४१ त्रिनेत्र
नाथ सीडस्, औरंगाबाद
एनसीईएच -२ आर
तुलसी सीडस्, गुंटुर
तुलसी – ४
विक्रम सीडस्, अहमदाबाद
व्ही आयसीएच-५, व्ही आयसीएच-१५
जे.के.सीड्स, हैद्राबाद
वरुण, दुर्गा
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबाद
बन्नी, मल्लिका, कनक -९५४, भक्ति
पारस सिड्स
ब्रह्मा
देशामध्ये सन २०१२-१३ पर्यंत १००० पेक्षा अधिक बीटी वाण आहेत. शेतक-यांनी आपल्या गरजेनुसार वाणाची निवड करावी.
ब) अमेरिकन X इजिप्शियन
कंपनीचे नाव
बी.टी.संकरित वाण
नाथ सीडस्, औरंगाबाद
काशिनाथ
कृषिधन सीडस्, जालना
सुपर फायबर
महिको सीडस्, जालना
एमआरसी – ७९८१
अंकूर सीडस् नागपूर
अंकूर – १९५१
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबाद
एन.सी.एच.बी.९९२

    बीजप्रक्रिया

  • बुरशीनाशक

  • अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकांची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणात करावी. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

  • जीवाणू संवर्धक

  • हवेतील नत्राचे स्थिरीकरण करुन नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम या जीवाणू संवधर्काची प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरुन ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी स्फूरद विरघळणा-या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.

    पेरणी

    बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनाता घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.
    वेगवेगळ्या भागासाठी, उदा. १) सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा, २) अहमदनगर जिल्हयासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा आणि ३) खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा, याप्रमाणे पेरणीच्या वेळीची शिफारस केलेली आहे. पेरणी करताना सरीच्या मध्यावर २-३ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे.
    बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से.पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.

    बागायती कपाशीसाठी रासायनिक खते

    बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे.  वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात.
    द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरुप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा.
      आंतरमशागत

  • नांग्या भरणे

  • सर्वसाधारणपणे १० दिवसांत सर्व बिया उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, त्याच सुधारित अगर संकर वाणाचे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत.

  • विरळणी

  • पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेऊन बाकीची उपटून टाकावीत. विरळणी जमीन ओली असताना करावी.

  • खुरपणी

  • पेरणीनंतर जरुरीप्रमाणे दोन खुरपण्या व कोळपणी करुन ६० दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. यासाठी जेथे शक्य असेल तेथे जरुरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी खालीलप्रमाणे एक रासायनिक तणनाशक वापरावे व आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या कराव्यात. तणनाशकामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.
    अ.क्र
    तणनाशकाचे नाव
    क्रियाशील घटकाचे हेक्टरी प्रमाण
    हेक्टरी पाण्याचे प्रमाण
    फवारणीची वेळ
    पेन्डीमिथॅलिन
    १.५ लिटर
    ५०० लिटर
    उगवणीपूर्वी एक फवारा
    क्युझॉलोफॉपइथिल
    १.५ लिटर
    ५०० लिटर
    पेरणीनंतर १०-३५ दिवसापर्यंत
    भारी जमिनीत विशेषत: रासायनिक खते व पाणी जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते. त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते व बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो. यासाठी पीक ७० ते ८० दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा  खुडावा, यामुळे पिकात हवा खेळती राहते. बोंडे सडत नाहीत व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

    संजीवकाचा वापर

    कपाशीला लागणारे पात्या, फुले, बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते. नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलिन अॅसेटिक अॅसीड (प्लॅनोफिक्स) या संजीवकाची हेक्टरी १०० मि.ली व ५०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी त्यानंतर १५ ते २० दिवसांनी करावी. यामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.

    पाणी पुरवठा

    सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पेरलेल्या कपाशीला ८०० ते ९०० मि.लि. पाणी लागते. कपाशीला पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेने कमी पाणी लागते. या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये, कारण जादा पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते. पीक फुलो-यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते व बोंडे भरताना ती सर्वांत जास्त असते. कपाशीच्या उगवण, पाते लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असणे जरुरीचे आहे. पेरणी ओलाऊन करावी. नंतर ३ ते ४ दिवसांनी चिंबवणीचे पाणी द्यावे. पावसाळा सुरु होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान व जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात पाऊसमान पाहून पाणी द्यावे. मात्र दोन पाळ्यांत १५ ते २० दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेऊ नये. जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड सरी यापध्दतीने पाणी द्यावे. पहिल्या पाळीला १ ली, ३ री, ५ वी याप्रमाणे स-यांत पाणी सोडावे व दुस-या पाळीला २ री, ४ थी, ६ वी याप्रमाणे स-यांत पाणी सोडावे. यामुळे कपाशीला लागणा-या पाण्यात सुमारे ३० टक्के बचत होते.

    ठिबक सिंचनाचा वापर

    शेतात पाहणी केल्यानंतर आराखड्यानुसार ठिबक संचाचीउभारणी करावी. त्यामुळे पाण्याची  बचत तर होतेच शिवाय तणांचा उपद्रव कमी होतो.

    पेरणी अंतर

    उन्हाळी बागायती कपाशीत भुईमूगाचा एस.बी. ११ हा उपट्या वाण किंवा मुग, उडीद किंवा गवार आंतरपीक म्हणून घेतल्यास जास्त फायदा होतो. यासाठीच्या सरीच्या एका बाजूस कपाशी,  दुस-या बाजूस भुईमूग यांची १: १ या प्रमाणात पेरणी करावी. दोन्ही पिकांची पेरणी सरीच्या बगलेच्या मध्यावर करावी. आंतरपिकाची पेरणी कपाशीच्या पेरणीपूर्वी एक महिना अगोदर केल्यास फायदा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच तूर, सोयाबीन यासारखी आंतरपीके घेतल्यास फायदा होतो.

    वेचणी

    शेतातील अंदाजे ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी, त्यानंतर साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेचण्या कराव्यात. कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले, कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा, असलेला व किडका आणि कवडी कापूस वेगळा वेचावा. प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा, वेचल्यानंतर कापूस ३-४ दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.

    पिकांची फेरपालट


    कपाशीचा प्रकार
    १ ले वर्ष
    २ रे वर्ष
    ३ रे वर्ष
    उन्हाळी
    ऊस
    ऊस-खोडवा
    उन्हाळी कापूस + गहू/हरभरा
    खरीप पूर्व
    कापूस + गहू/हरभरा
    भुईमूग/तीळ +ज्वारी+करडई
    -----

    कायिक बदल
    लाल्या
    लक्षणे:- कपाशीची पाने लाल होण्याचे मुख्य कारण नत्राची कमतरता होय. नत्र खतांच्या कमतरतेमुळे बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये पानातील हरित द्रव्यामधील नत्र वापरले जाते आणि पाने लाल होतात. तसेच मॅग्नेशियम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणा-या किडींच्या (मुख्यत्वे तुडतुडे) प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीची पाने लाल होतात.
    उपाय :- १) लाल्या प्रतिकारक वाणांची निवड करावी. २) शिफारसीत खतांच्या मात्रा द्याव्यात. बीटी वाणासाठी शिफारशी मात्रेपेक्षा २५ टक्के खत जास्त द्यावीत. त्यामध्ये २० टक्के नत्र लागवडीच्या वेळी, ४० टक्के नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि ४० टक्के नत्र लागवडीच्या ६० दिवसांनी द्यावे, मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य (२० ते ३० किलो/हे) जमिनीत द्यावे. वाढीच्या काळात २ टक्के डिएपी खतांच्या दोन फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

    आकस्मिक मर रोग

    लक्षणे – दिवसाचे तापमान ३८०  सें.पेक्षा जास्त दिर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणा-या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्राव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.
    उपाय :- वेळेवर पाणी द्यावे. (८-१० दिवसांच्या अंतराने) पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी जास्त करु नये २) पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. ३) विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया + १.५ किलो पालाश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. द्यावे. ४) त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी १०० लिटर पाणयात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.
    पीक सरंक्षण
    1. कपाशीवरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन
    रोगाचे नाव
    कधी दिसतो (पेरणीपासून दिवस)
    ओळख
    उपाय
    बुरशीजन्य करपा  (अल्टरनेरिया ब्लाइट)
    ७०-७५ दिवस
    पानावर व बोंडावर गोलाकार विटकरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके
    प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
    जीवाणूजन्य करपा (बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट)
    ७५-८० दिवस
    पानावर गडद विटकरी रंगाचे कोनात्मक ठिपके
    वरीलप्रमाणे
    मर व मुळकूज (बिल्ट व रुट रॉट)
    उगवणीपासून
    झाड वाळून जाते मुळे सडतात/कुजतात
    तीन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम किंवा ४ ग्रॅंम प्रति किलो प्रमाणे ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया करावी, रोग प्रतिकारक वाण वापरावे.


    कपाशीवरील प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन


    १) रसशोषक किडी
    किडीचे नाव
    कधी दिसतात(पेरणीपासून दिवस)
    ओळख
    उपाय
    मावा
    ४५
    फिकट पिवळे/गर्द हिरवे/काळपट रंगाचे, साधारण २ मिमी लांब
    १)बीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू.एस ४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान २५ डी.एस ६० ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास        २) खोडप्रक्रिया – ऑक्सीडिमेटॉन मिथील २५ ई.सी. हे आंतरप्रवाही किटकनाशक १:४ या प्रमाणात पाण्यात मिसळून कपाशी पिकाच्या हिरव्या खोडावर मध्यभागी एका बाजूने ४-५ इंच भागावर लावावे.
    ३) ५ % निंबोळी अर्काची फवारणी.
    ४) क्रायसोपा अंडी ५०,०००/- प्रति हेक्टरी पिकावर सोडावीत.
    ५) डायमिथोएट ३० ई.सी १३ मिली ऑसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
    तुडतुडे
    उगवणीपासून
    तिरके चालणारे, पंखविरहीत, हिरवट रंगाचे किडे, पानाखाली
    फुलकिडे
    १ ते ३०
    पिल्ले आकाराने लहान, फिकट पिवळ्या रंगाचे, प्रौढ पिवळसर रंगाचे
    डायमेथोएट ३० ईसी १३ मिली, २५ ईसी किंवा फिप्रोनील ५ ई.सी. ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
    पांढरीमाशी
    ८०-११०
    पांढ-या रंगाची आकाराने लहान व दोन पंख असलेली
    फवारणी – अॅसिटीमिप्रिड २० एस.पी . २ ग्रॅम किंवा – ट्रायझोफॉस ४० ई.सी ३५ मि.ली. किंवा बुप्रोकेजिन २५ ईसी २० मिली किंवा निंबोळी अर्क ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
    पिठ्या ढेकूण
    पिकाच्या सर्व अवस्था
    शरीरावर पांढरट मेणचट आवरण असते.
    व्हर्टिसिलीअम लेकानी ५० ग्रॅम किंवा ब्रुप्रोकेजिन २५ ईसी ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

    1. बोंड अळी
    किडीचे नाव
    कधी दिसतात (पेरणीपासून दिवस)
    ओळख
    उपाय
    अमेरिकन बोंड अळी(हिरवी अळी)
    ४५-८५
    अळी हिरव्या रंगाची असून, शरीरावर लांबीच्या बाजूने तुटक करड्या रेषा असतात. पतंग मोठ्या आकाराचा पिवळसर तपकिरी रंगाचा असतो.
    जैविक नियंत्रण
    एच.एन.पी.व्ही ५०० एल.ई./हेक्टर
    बी.टी.व्हार कुरस्टाकी १ किलो/हेक्टर
    क्रायसोपा अंडी ५००००/हेक्टर,
    फेरोमन सापळे हेक्टरी ५,
    निंबोळी अर्क ५ टक्के फवारणी
    रासायनिक नियंत्रण
    • लॅम्बाड सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी.८ मिली
    • स्पिनोसॅड ४५ एस.सी. ३.५ मिली किंवा
    • प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मिली किंवा
    • इन्डोझॅकार्ब १५.८ ई.सी. ८ मिली किंवा
    • क्यलोरपायरीफॉस ५० ई.सी. २० मिली किंवा
    • क्विनॉलफॉस २० ई.सी. २० मिली १० लीटर पाण्यात मिसळून गरजेनुसार एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
    ठिपक्याची बोंड अळी
    ३०-६५
    अंगावर पांढरे ठिपके असतात ही तपकिरी रंगाची अळी १५-१८ मि.मी लांब असते.
    शेंदरी बोंड अळी
    ७५-११०
    शेंदरी रंगाची अळी साधारण १८-१९ मि.मी लांब असते. डोक्याजवळचा भाग काळपट रंगाचा असतो.


    कापसाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

    1. पेरणीच्या वेळी
    बीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू, एस. १० ग्रॅम किंवा कार्ब्रासल्फान (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) सापळा पिके म्हणून मका, चवळी, ज्वारी, राळा यांची लागवड करावी.
    1. पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी रस शोषणा-या किडींसाठी फवारणी करावी.
    1. क्रायसोपा अंडी ५००००/ हेक्टरी शेतामध्ये सोडवीत.
    2. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
    3. डायमिथोएट ३० ईसी ८ मिली किंवा मेथील डिमेटॉन २० ई.सी. २४ मिली किंवा ऑसिफेट ७५ एस.पी १० लीटर प्रती पाण्यात मिसळून फवारावे.
    1. शेंडे अळी व बोंड अळीसाठी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी करावी.
    1. बीटी कुरस्टाकी १ किलो/हेक्टरी फवारणी.
    2. ट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष/हेक्टर
    3. फेरोमेन सापळे आणि पक्षी थांबे शेतामध्ये लावावेत.
    1. रस शोषणा-या किडीसाठी तिसरी फवारणी, दुस-या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी
    1. अॅसिटॅमिप्रिड २० एस.पी. २ ग्रॅम किंवा
    2. ट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष/हेक्टर
    3. अॅसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
    1. सर्वप्रकारच्या बोंड अळ्या शेंडे अळी, अमेरिकन व शेंदरी बोंड अळी
    एच.एन.पी.व्ही. ५०० एल.ई/हेक्टर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ८ मि.ली. स्पिनोसॅड ४५ ई.सी. ३.५ मि.ली. किंवा १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
    बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी
    पीक साधारणपणे १ ते १.५ महिन्याचे असताना शेतात शेंडेअळीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. किडग्रस्त शेंडे तोडून नाश करावा.
    संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करुन नयेय
    संश्लेषित पायरेथ्राईडच्या वापरानंतर दुसरी फवारणी अॅसिफेट/कार्बारील किंवा क्यॅुनॉलफॉसची करावी.
    अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी फवारावे.
    सर्व प्रकारच्या बोंडअळीसाठी बी.टी, हे जैविके अणुजीवयुक्त किटकनाशक वापरावे.
    अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत.
    कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे.
    निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांच्या सुरुवातीच्या काळात वापर करावा.
    पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.
    उत्पादन – बागायती कपाशीच्या सुधारित वाणांचे हेक्टरी २० ते २४ क्विंटल तर संकरित वाणाचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल.

    सीताफळाची आदर्श लागवड आणि व्यवस्थापन असे करावे

    कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हेक्‍टरी महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते. ...