कोरडवाहू फळझाडांमध्ये सिताफळ हेक्टरी महत्वाचे फळपिक असून त्याची लागवड प्रामुख्याने अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते. फळबागांचे प्रस्थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे. फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्या गरीबांचा रानमेवा म्हणून वरदायी ठरलेले आहे.
सिताफळाची लागवड प्रामुख्याने आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश व बिहार राज्यात केली जाते. महाराष्ट्रामध्ये बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्याची सिताफळे फारच स्वादिष्ट लागतात असा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो. मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्हे आणि खंडाळा फलटण तालुक्यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्वी गवडीतून नावारूपाला येऊ लागला आहे. महाराष्ट्रात सन 1989-90 पर्यंत कोरडवाहू फळझाडाखाली एकूण 242100 हेक्टर क्षेत्र असताना त्यापैकी एकटया सिताफळाखाली 2800 हेक्टर क्षेत्र यशस्वी लागवडीची ग्वाही देणारे ठरले आहे. सन 1990 – 91 पासून सुरु झालेल्या रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्या लागवडीस सिताफळाचा समावचेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे सिताफळ लागवड ही शेतकरी बांधवांना चालून आलेली एक संधी आहे. महाराष्ट्रात सन 1990-91 पासून या योजनेअंतर्गत सिताफळाची यशस्वी लागवड 25906 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली आहे.
सिताफळ हेक्टरी अतिशय काटक फळझाड असून त्याचे लागवडीकडे अद्यापही शास्त्रीय दृष्टीने लक्ष देण्यात आलेले नाही. सिताफळाची पाने शेळयामेंढया, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्ये कुंपणाच्या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशिर ठरते. त्याचप्रमाणे बरड जमिन ओलाव्याची जागा, नदीकाठची जमीन, शेताचे बांध, माळराने, डोंगर उताराच्या जमिनी अशा वेगवेगळया प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते.
औषधी उपयोग -
सिताफळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असून बर्याच पोटदुखीच्या विकारामध्ये या फळांचा उपयोग केल्यास निश्चितच फरक पडतो. सिताफळाच्या झाडांची पाने, साल, मुळ, बियाया सर्वाचाच उपयोग अनेक कारणांसाठी होत असल्याने सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात करणे फायदेशीर आहे.
फळांचा उपयोग रक्तशुद्धीसाठी (टॉंनिक) म्हणून तसेच खोकला, सर्दी, पोटाचे विकार, पित्त, हगवण व क्षय रोगांस प्रतिबंधक म्हणून होतो. सिताफळापासून तयार केलेले सिताफळसव या औषधाचे सेवन वर्षभर नियमित केल्यास क्षयरोग व हगवणींचा विकार असलेल्या व्यक्तीस हमखास फरक पडतो. सिताफळाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग शौचास त्रास किंवा व्यवस्थित होत नसल्यास केला जातो, तर पानांचा उपयोग मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तिस साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी आहे.
फळांचा उपयोग रक्तशुद्धीसाठी (टॉंनिक) म्हणून तसेच खोकला, सर्दी, पोटाचे विकार, पित्त, हगवण व क्षय रोगांस प्रतिबंधक म्हणून होतो. सिताफळापासून तयार केलेले सिताफळसव या औषधाचे सेवन वर्षभर नियमित केल्यास क्षयरोग व हगवणींचा विकार असलेल्या व्यक्तीस हमखास फरक पडतो. सिताफळाच्या झाडाच्या मुळांचा उपयोग शौचास त्रास किंवा व्यवस्थित होत नसल्यास केला जातो, तर पानांचा उपयोग मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तिस साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी आहे.
सिताफळाचे उपयोग
सिताफळ अत्यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत करतात. सिताफळामध्ये खनिजद्रव्ये आणि जीवनसत्वे उपलब्ध करून देण्याची चांगली क्षमता असल्यामुळे ते एक पुरक अन्न आहे. सिताफळाच्या ताज्या 100 ग्रॅम गरात पुढीलप्रमाणे अन्नघटक द्रव्यांचा समावेश होतो.
| अ. क्र. | घटक द्रव्ये | शेकडा प्रमाण |
|---|---|---|
| 1. | पाणी | 73.30 |
| 2. | प्रथिने | 1.60 |
| 3. | खनिजे | 0.70 |
| 4. | पिष्टमय पदार्थ | 23.50 |
| 5. | चुना | 0.20 |
| 6. | स्फुरद | 0.47 |
| 7. | लोह | 1.00 |
सिताफळाच्या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत. पानांचा वापर कडवट औषधे बनविण्यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्हणून करतात. सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्क्रीम बनविण्यासाठी वापरली जाते. तो एक छोटासा कुटिर उद्योग घरबसल्या महिलांना करण्यासारखा आहे. सिताफळाची मोठी झाडे जूनी झाली म्हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेडयावाकडया टणक वाळलेल्या फळांची कुटून बारीक पावडर करून ती कातडी कमविण्याच्या धंदयात देखिल वापरात आणता येते.
सिताफळाची लागवड शास्त्रीय दृष्टया पुढिलप्रमाणे करता येते.
हवामान व जमीन
महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. अत्यंत कोरडया रखरखीत व उष्ण हवामानाच्या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्या हवामाना पर्यंतच्या प्रदेशात सिताफळ वाढते. मात्र उष्ण व कोरडया हवामानातील सिताफळे चविला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. कोकणासारख्या जास्त दमटपणा असलेल्या भागाताही हे झाड वाढते. पण अशा हवामानात तेथील फळे आकाराने लहान येतो. आकाराने लहान असलेले हे फळझाड दमट हवामानामध्ये नेहमी हिरवेागर राहते. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये डिसेंबर ते फेब्रूवारी या काळात त्याची पान गळती होऊन झाडे विश्रांती घेतात. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही. थंड हवामानामध्ये फळे घट्ट व टणक राहून पिकत नाहीत. मोहोराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. पावसाळा सुरु झाल्याखेरीज झाडांना फलधारणा होत नाही. सिताफळाचे झाड अवर्षणाला उत्तम प्रतिसाद देत असले तरी अति-अवर्षण मात्र या झाडाला अपायकारक ठरते. साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी 500 ते 750 मिमि पाऊस आवश्यक असतो.
सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्त भागासाठी शिफारस केली असल्यामुळे हेक्टरी फळझाड कोणत्याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्दा सिताफळाचे झाड वाढू शकते. अत्यंत हलक्या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्तृत प्रकारच्या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्कलीयुक्त जमिनी या फळझाडाला अयोग्य ठरतात.
जाती
सिताफळाच्या 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. अधिक उत्पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर ही मोठया फळाची चांगल्या गराची (48 टक्के ) जात असून आपल्या हवामानात आणि जमिनीत चांगली येते. अर्का सहान, अॅनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्स, पिंक बुलक्स हाई, अॅर्टिमोया वॉशिंग्टन 10705, वॉशिंग्टन 98787 इ. जाती आहेत.
१) लाल सिताफळ : या सिताफळाची झाडे कमी उंचीची असून पाने लहान असून मधली शीर जांभळट रंगाची असते. एका झाडापासून ५० ते ७५ फळे मिळतात. फळामध्ये बियांचे प्रमाण जास्त असून गर रंगाने गुलाबी व साधारण चवीचा असतो. फळ बाहेरून लालसर जांभळ्या रंगाचे दिसते. मुंबई मार्केटला गुजराती समाजाचे लोक या वाणाची खरेदी करतात. त्यमुळे बाजारभाव चांगला मिळत असल्याने थेट हैद्राबादहून ही फळे मुंबईला येतात.
२) बिटीश गियाना : उत्पादनाच्या दृष्टीने ह्या जातीच्या झाडांपासून फळे भरपूर मिळतात. फुलापासून फलधारणा जादा होते. फळे आकर्षक १७५ ते २०० ग्रॅम वजनाची असून आकार मध्यम असतो. फळांमध्ये गर कमी व बी जास्त असते.
३) मेमॉब : फळे लंबोळ्या आकाराची असून फळ फोडले असता फोडी रुंद, गोल असतात. चव, स्वाद अप्रतिम असल्याने तसेच बियांचे प्रमाण कमी असल्याने फळांना मागणी भरपूर आहे. एका झाडावर ८० ते १०० फळे लागतात. फळे दरवर्षी, नियमित लागतात. फळे वजनाने हलकी साधारण १८० ते १९० ग्रॅमची असतात.
४) वॉशिग्टन (१०७००५) : या वाणाची लागवड महाराष्ट्रात फारच कमी आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात ह्या वाणाची झाडे पाहायला मिळतात. फळे आकाराने लहान १६५ ग्रॅम वजनाची असतात. गर लोण्यासारखा मऊ, पिवळसर छटा असलेला दिसतो.
५) बाळानगर : ही जात मुळची हैद्राबादजवळ बाळानगर भागातली. या वाणाच्या बियापासून रोपे महाराष्ट्रात १० ते १५ वर्षापासून शासनामार्फत वाटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाळानगर वाणाच्याच सिताफळाच्या बागा दिसतात. ह्या फळाचा आकार मोठा, होळे मोठे आहेत. फळामध्ये बी कमी व गर जादा असतो. गराची चव अतिशय चांगली आहे. गरात साखरेचे प्रमाण साधारण असल्याने टिकाऊपणा जास्त आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये ह्या वाणाचा गर वापरला जातो. इतर वाणांपेक्षा या सिताफळाला बाजारभाव चांगली मिळतो.
१) लाल सिताफळ : या सिताफळाची झाडे कमी उंचीची असून पाने लहान असून मधली शीर जांभळट रंगाची असते. एका झाडापासून ५० ते ७५ फळे मिळतात. फळामध्ये बियांचे प्रमाण जास्त असून गर रंगाने गुलाबी व साधारण चवीचा असतो. फळ बाहेरून लालसर जांभळ्या रंगाचे दिसते. मुंबई मार्केटला गुजराती समाजाचे लोक या वाणाची खरेदी करतात. त्यमुळे बाजारभाव चांगला मिळत असल्याने थेट हैद्राबादहून ही फळे मुंबईला येतात.
२) बिटीश गियाना : उत्पादनाच्या दृष्टीने ह्या जातीच्या झाडांपासून फळे भरपूर मिळतात. फुलापासून फलधारणा जादा होते. फळे आकर्षक १७५ ते २०० ग्रॅम वजनाची असून आकार मध्यम असतो. फळांमध्ये गर कमी व बी जास्त असते.
३) मेमॉब : फळे लंबोळ्या आकाराची असून फळ फोडले असता फोडी रुंद, गोल असतात. चव, स्वाद अप्रतिम असल्याने तसेच बियांचे प्रमाण कमी असल्याने फळांना मागणी भरपूर आहे. एका झाडावर ८० ते १०० फळे लागतात. फळे दरवर्षी, नियमित लागतात. फळे वजनाने हलकी साधारण १८० ते १९० ग्रॅमची असतात.
४) वॉशिग्टन (१०७००५) : या वाणाची लागवड महाराष्ट्रात फारच कमी आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात ह्या वाणाची झाडे पाहायला मिळतात. फळे आकाराने लहान १६५ ग्रॅम वजनाची असतात. गर लोण्यासारखा मऊ, पिवळसर छटा असलेला दिसतो.
५) बाळानगर : ही जात मुळची हैद्राबादजवळ बाळानगर भागातली. या वाणाच्या बियापासून रोपे महाराष्ट्रात १० ते १५ वर्षापासून शासनामार्फत वाटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाळानगर वाणाच्याच सिताफळाच्या बागा दिसतात. ह्या फळाचा आकार मोठा, होळे मोठे आहेत. फळामध्ये बी कमी व गर जादा असतो. गराची चव अतिशय चांगली आहे. गरात साखरेचे प्रमाण साधारण असल्याने टिकाऊपणा जास्त आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये ह्या वाणाचा गर वापरला जातो. इतर वाणांपेक्षा या सिताफळाला बाजारभाव चांगली मिळतो.
सुधारीत जाती
महाराष्ट्रात सिताफळाच्या नामवंत प्रचलित जाती बहूधा संशोधनातून विकसित झालेल्या नाहीत. आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ हया जाती उत्पादन व दर्जाचे दृष्टीने चांगल्या आढळून आलेल्या आहेत. वॉशिंग्टन पी-1, बारबाडोस या सुध्दा सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत.
अभिवृध्दी
सिताफळाची लागवड प्रामुख्याने बियांपासून रोपे तयार करून केली जाते. ताजे बी तीन दिवस पाण्यात भिजून घालून नंतर पेरावे. रोप गादीवाफयावर किंवा पॉलिथीनच्या पिशवीत तयार करून पावसाळयामध्ये शेतात कायमच्या जागी लावावीत. ही रोपे पावसाळा संपल्यानंतर एकदा जगली की नंतर अवर्षणाला तोंड देत वाढू शकतात. सिताफळाचे डोळे भरून किंवा मृदुकाष्ट कलम सुध्दा करतात. कलमे करण्यासाठी स्थानिक सिताफळाचे खुंटाचा वापर करता येतो. त्याचप्रमाणे सिताफळाची अभिवृध्दी छाटे वापरून देखिल करता येते. मात्र छाटयांची अभिवृध्दी सहजासहजी होत नाही. छाटे घेण्यापूर्वी फांद्या जमिनीत गाडून नंतर त्या फांदयाची छाटे घेवून त्यांना 5000 पीपीएम एन ए ए चा वापर करून अतिसुक्ष्म तुषारगृहामध्ये ठेवल्यास छाटयांना मुळया फूटतात. सिताफळाच्या अभिवृध्दीसाठी डोळे भरणे, मृदकाष्ट आणि भेट कलम याव्दारे छाटयांपेक्षा अधिक यश मिळते.
लागवड
सिताफळाच्या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी मे महिन्यात 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खडडे जमिनीचा मगदुर पाहून घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडे बसतात. हेक्टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्दतीने वापरण्यात यावे. यासाठी हेक्टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची आवश्यकता आहे. अशा प्रकारे खडडे भरल्यानंतर झाडाची लागवड पावसाळयात करावी.
खते
सिताफळाच्या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत. परंतु मोठे फळ व चांगले उत्पन्न येण्यासाठी पावसाळा सुरु झाल्याबरोबर प्रत्येक झाडाला 2 ते 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे योग्य ठरते. तसेच पहिल्या 3 वर्षापर्यंत प्रत्येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.
| वर्ष | नत्र (ग्रॅम) | स्फूरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) |
|---|---|---|---|
| 1 | 125 | 125 | 125 |
| 2 | 250 | 250 | 250 |
| 3 | 375 | 250 | 250 |
5 वर्षापुढील प्रत्येक झाडाला 5 ते 7 पाटया शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.
पाणीपुरवठा
सिताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्याने वरच्या पाण्याशिवाय वाढू शकते. सिताफळाच्या पिकाला नियमित पाण्याची आवश्यकता नसते. निव्वळ पावसाच्या पाण्यावरही चांगले उत्पन्न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्हाळयात पाणी दिल्यास झाडांची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्टेबर ऑक्टोबर महिन्यात पाण्याच्या 1 ते 2 पाळया दिल्यास भरपूर व मोठी फळे मिळतात.
बागेची निगा
- सिताफळाची रोपे लावल्यानंतर काही रोपे मेली असतील तर महिन्याचे आत नांग्या भरून घ्याव्यात. तसे शक्य न झाल्यास पुढील वर्षी जून महिन्यापूर्वी नांग्या भराव्यात.
- खुरपणी करून बागेतील तण काढावेत.
- रोपे लहान असताना पावसाचा ताण पडल्यास मधून मधून पाणी द्यावे.
- झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता व चांगले फळ मिळण्याकरिता छाटणी करावी. छाटणी करताना झाडाला योग्य वळण सुरुवातीच्या वाढीच्या काळात द्यावे. त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात.
- पावसाचा ताण जास्त पडल्यास 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.
- बागेमध्ये वेळोवेळी आंतर मशागत करावी.
आंतरपिके
सिताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात जमिनीच्या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्यादी पिके घेता येतात.
बहार धरणे
बहार धरण्याच्या तंत्रांत पाणी तोडण्याची पनध्दत प्रथम विचारात घ्यावी. ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार आणि झाडांच्या वयोमानानुसार
कमी जास्त होऊ शकतो. विश्रांतीचा काळ बहार येण्यापूर्वीच हलक्या जमिनीत 35 ते 40 दिवस मध्यम भारी जमिनी 45 ते 55 दिवस अतिभारी जमिनीत 60 ते 70 दिवस ठेवावा. सर्वसाधारणपणे झाडांची 35 ते 50 टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे.
ताण सुरु करण्यापूर्वी अगोदरच्या बहाराची सर्व फळे झाडावरून उतरवून घेणे गरजेचे असते. ताण देण्यापूर्वीच आवश्यक फळे, फूले, वाळलेली फळे झाडावर असल्यास ती काढून टाकावीत. त्यानंतर बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर बंद करावे.
कीड - पिठ्या ढेकूण (मिली बग ) : ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यांतून रस शोषून घेते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्यांची आणि फळांची गळ होते. सिताफळाच्या फळांची वाढ होत असताना पृष्ठभागांच्या भेगांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड फळातील रस शोषून घेते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीच्या अंगावर लोकरी माव्यासारखे पांढरे आवरण असल्याने फवारणी केलेले औषध किडीपर्यंत पोहचत नाही.नियंत्रण : जून - जुलै महिन्यात या किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. अशा वेळी १५ ते २० सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिकची पट्टी घेऊन त्याला ग्रीस लावावे. हि पट्टी ग्रीस वरच्या बाजूला लावून सर्व्ह बाजूंनी बांधून घ्यावी, त्यामुळे खालून वर चढणारे किडे ग्रीसला चिकटून मरून जातात.
रोग :
१) सिताफळे कडक पडणे (स्टोन फ्रुटस) :या विकृतीमध्ये सिताफळाच्या फळांची पूर्ण वाढ होत नाही. फळे आकाराने लहान राहतात., कडक होतात आणि त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो. ही फळे, इतर फळांची काढणी पूर्ण होऊन झाड सुप्तावस्थेत गेल्यानंतरही झाडावर तशीच राहतात. फळवाढीच्या काळात ही फळे अन्नरसासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे अन्नरसाचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती निर्माण होते.
२) सिताफळे काळी पडणे :
सिताफळे ज्यावेळेस कैरीएवढी असतात या काळात जर हवेत आर्द्रता व संततधार पाऊस पडत असेल तेव्हा देठाजवळील खोलगट भागात पाणी साचून तेथील पेशी कुजू लागतात, बुरशी दिसते. याचे प्रमाण वाढत जाऊन सिताफळाचा बराचसा भाग काळा पडतो. प्रथमत: हे तपकिरी डागासारखे दिसून नंतर पूर्ण फळ काळे होऊ लागते. दुसरे कारण म्हणजे जर सिताफळाची बाग भारी काळ्या जमिनीत असेल. पाण्याचा निचर व्यवस्थित होत नसेल तेव्हा, तसेच बागेत स्वच्छता नसल्यास (तण वाढल्यास) हा प्रादुर्भाव होतो.
काढणी, प्रतवारी, पॅकिंग व साठवण
सिताफळामध्ये डोळे उघडणे ही क्रिया पूर्ण झाली म्हणजे झाडावरची फळे उतरविण्यास काही हरकत नाही. बहूदा सिताफळाची लागवड केल्यापासून 5 ते 6 वर्षानी फळे मिळू लागतात. कलमे केलेल्या झाडांना 3 ते 4 वर्षात फळे लागण्यास सुरुवात होते. सिताफळांच्या झाडांना जून, जूलै मध्ये फूले येण्यास सुरुवात होते. फूले आल्यावर फळे तयार होण्यास सर्वसाधारणपणे 5 महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेबर ते नोव्हेबर मध्ये तयार होतात. आणि दसरा, दिवाळीच्या सुमारास सिताफळे बाजारात येतात. शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे सिताफळाच्या बहरात फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणीसाठी ग्राहय धरावेत अशा वेळी फळांचे खवले (कडा) उकलू लागल्या व आतील दुधाळ भाग किंचित दिसू लागला की फळे तयार झाली असे समजून फळांची काढणी करावी.
प्रतवारीसाठी पाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत. मोठी व आकर्षक फळे निवड करून अ ग्रेड ची म्हणून बाजूला काढावीत. फळे मध्यम आकाराची असल्यास ती ब ग्रेड ची म्हणून निवडावीत आणि राहिलेली लहान सहान फळे ही क ग्रेडची म्हणून समजावीत.
स्थानिक बाजारपेठांकरिता जर माल पाठवायचा असेल तर उपलब्धतेनुसार बांबूच्या करंडयात खालीवर कडूलिंबाचा पाला घालून त्यात फळे व्यवस्थित भरावीत व फळे विक्रीसाठी तयार झालेली वेडयावाकडया आकाराची फळे शक्यतो अगदी जवळच्या स्थानिक बाजारात त्वरीत विकून टाकावीत.
सिताफळ हेक्टरी जास्त नाशवंत फळ असल्यामुळे ते जास्त दिवस साठविता येत नाही. शितगृहातसुध्दा सिताफळ जास्त दिवस ठेवता येत नाहीत आणि समजा मोठया प्रमाणात व्यापारी तत्वावर उत्पादन करणा-या या शेतकरी बांधवांनी सामुहीकपणे शितगृहाची व्यवस्था उपलब्ध केल्यास या फळासाठी शितगृहातील साठवणूकीचे तापमान 39 ते 42 फॅरनहिटस तर आर्द्रता 45 ते 90 टक्के राखावयास हवी. असे झाल्यास साठवणूकीचा कालावधी 5 ते 6 आठवडे राहतो.
फळांची काढणी व उत्पादन : सिताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात, तर बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळे लागतात. जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते. सर्वसाधारणपणे ६ ते ७ वर्षे वयाच्या झाडाला १०० ते १५० फळे येतात.
सिताफळाच्या झाडांना जून - जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे ५ महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात.
सिताफळाची योग्य वेळी काढणी करावी. पक्क सिताफळे झाडावर जास्त काळ राहू दिल्यास फळांना तडे पडतात आणि फळे कुजू लागतात. स्थानिक जातीच्या सिताफळाचे दोन प्रकार आढळतात. एका प्रकारच्या सिताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि आतील गर पिवळसर रंगाचा असतो, तर दुसऱ्या प्रकारच्या सिताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि गर पांढर्या रंगाचा असतो. यापैकी पिवळसर गर आलेले सिताफळ उत्कृष्ट समजले जाते. सिताफळाच्या फळांचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांची काढणी केल्यानंतर फळे ३ -४ दिवसांत नरम पडून खाण्यायोग्य होतात. सिताफळाची फळे नशावंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणूनच काढणीनंतर शक्य तितक्या लवकर फळांची विक्री करावी.
मार्केट :
सिताफळांस ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असून दूरच्या बाजारपेठेत पाठवितान मार्केटचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच झाडावरून फळे पक्क होण्याच्या थोडे अगोदर काढणी करून बाजारपेठेत ताबडतोब पाठवावी. कारण सिताफळ हे नाशवंत असल्याने जास्त दिवसे ठेवल्यास खराब होतात. मुंबई मार्केटमध्ये मोठ्या सिताफळास ७० ते १०० रू. ६ नग असा भाव मिळतो.
सिताफळाला दसरा दिवाळीत बाजारभाव कमी असतात. मात्र गौरी गणपती, महाशिवरात्रीला भाव चांगले असतात. मुंबई मार्केटला किंग साईज १ नंबर ४ ते ६ फळांना १०० ते १५० रू., २ नंबर १२ फळांना ८० ते ९० रू., ३ नंबर १५ ते १८ फळांना ४० ते ६० रू. ४ नंबर २४ ते ३० फळांना ३० ते ४० रू. दर मिळतो.
निर्यात : सिताफळाच्या निर्यातीस मध्य पूर्व युरोपीय देशांमध्ये, आखाती देशांत चांगले मार्केट असून जर्मनी, इंग्लंड देशामध्ये सिताफळ निर्यात होते.
चांगले सिताफळ कसे ओळखावे: सिताफळाचा आकर गोलाकार अंडाकृती व मोठा असल्यास डोळे व बिया भरपूर असल्यास अशा सिताफळांमध्ये गराचे प्रमाण कमी असते. तसेच लवकर खराब होतात. अशा सिताफळांना दूरच्या मार्केटमध्ये कमी भाव मिळतो.
सिताफळाचा आकार हृदयासारखा आणि डोळे व बिया कमी परंतु लांबट, मोठ्या असल्यास अशी सिताफळे जास्त दिवस टिकतात. तसेच गराचे प्रमाण जास्त असून चवीला मधूर, गोड असतात व अशा सिताफळांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाळानगरमध्ये अशा सिताफळांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बाळानगर ह्याच नावाने ही जात संबोधली जाते. ह्या सिताफळाची लागवड बाळानगर, हैद्राबाद, संगारेड्डी, दौलताबाद, औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात केली जाते.
काही वेड्यावाकड्या आकाराची फळे हिरवट रंगाची असून हे स्थानिक वाण परिंचे खंडाळा (सातारा ) डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. उकळत नसल्यामुळे तसेच अशा सिताफळांवर पांढरी बुरशी असते व त्यामध्ये अळी दिसते. त्यामुळे अशा फळांना मार्केटमध्ये कमी भाव मिळतो. सिताफळांच्या बियांचा आकार हा जाड, आखूड बोथट व रंग काळा किंवा करडा असल्यास गर भरपूर व अतिगोड, चिवट, घट्ट व सिलीकाचे प्रमाण जास्त असलेला तसेच अधिक शर्करायुक्त असून अशी सिताफळे आरोग्यवर्धक व बलवर्धक असतात. याउलट सिताफळांच्या बियांचा आकार लांबट असल्यास गर कातड्यासारखा चिवट व च्युईंगमसारखा चिकट, पातळ असतो, गराचे प्रमाण कमी असते, गर चवीस साधारण असतो. रासायनिक खते व किटकनाशके यांचा दुष्परिणाम जमिनीत व मानवास आज जाणवत आहेतच व काही काळानंतर ह्या रासायनिक खते व किटकनाशके यांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांना तोंड देणे अवघड होणार आहे. याची काही प्रगतीशील शेतकऱ्यांना जाणीव होऊन नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग करू लागले आहेत. नैसर्गिक, आयुर्वेदिक वनस्पतीजन्य किटकनाशके नामवंत शास्त्रज्ञांनी निर्माण केली आहेत. निरनिराळ्या उपयुक्त वनस्पतींपासून आपण विविध किटकनाशके निर्माण करू शकलो तर ते नक्कीच मानवाला वरदान ठरणारे आहे.
प्रक्रिया
सिताफळाचे मार्मालेड व जॅम बनवितात. डबाबंद सिताफळ (कॅनिंग) घरगुती आणि व्यापारी तत्वावर करणे, शितपेय गृहउद्योगात आईस्क्रिम बनविण्यासाठी सिताफळाची भूकटी (कस्टर्ड पाऊडर) इत्यादी सिताफळ प्रक्रियांना देखील बराच वाव आहे.
महत्त्वाचे : सिताफळांच्या पानांपासून व बियांपासून किफायतशीर नैसर्गिक किटकनाशक तयार करता येईल का ते प्रत्यक्ष प्रयोग करून पहावे. स्त्रियांच्या केसातील उवा, लिखा घालविण्यासाठी सिताफळांच्या पानांचा व बियांचा ठेचून केलेला काढा हे प्रभावी उवानाशक महणून सिद्ध झालेले आहे. याला निर्यातयोग्य मार्केट आफ्रिकेसारख्या उष्ण प्रदेशातील देशांमध्ये मिळू शकेल. तसेच याचा ढेकून, कोळी (माईटस) यावर उपाय करता येईल का ? यावरती संशोधन होणे शक्य आहे.














