फळझाड लागवड कार्यक्रम
राज्यातील कोरडवाहू शेतीचे प्रमाण जवळपास 82 टक्के आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने सन 1990-91 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड कार्यक्रम राज्य शासनाने सुरु केला आहे.
उद्देश
- शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या शेतावर कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणे.
- उच्च मुल्यांकित पीक रचना देणे.
- शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करुन त्यांचे राहणीमान उंचावणे.
- जमिनीवर वनस्पतीजन्य आच्छादन वाढविणे व जमिनीची धूप कमी करणे.
- पर्यावरण समतोल राखणे तसेच मोठ्या प्रमाणात असलेली 29 लाख हेक्टर पडजमीन मशागत योग्य करून फळपिकाच्या लागवडीखाली आणणे.
या महत्वाकांक्षी कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. सन 1990 पासून ही योजना राज्यात राबविली जात आहे. सन 1990 पूर्वी फळबागांखालील 2.42 लाख हेक्टर क्षेत्र होते. सन 2015-16 अखेर 18.52 लाख हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड झालेली आहे. यामधून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या 21.53 लाख आहे. सध्या योजनेमध्ये सुरुवातीच्या काळात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी लावलेल्या फळझाडांपासून उत्पादन मिळू लागले आहे. एवढेच नव्हे तर या सर्व प्रयत्नांमुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत आहे.
समाविष्ट जिल्हे- सर्व 34 जिल्हे
समाविष्ट फळपीक
कोरडवाहू फळपिके- आंबा, काजू, बोर, सिताफळ, चिंच, आवळा, फणस, कोकम, जांभूळ, कवठ.
बागायती फळपिके- नारळ, संत्रा, मोसंबी, चिक्कू, डाळिंब, पेरु, अंजीर, कागदी लिंबू, सुपारी.
इतर पिके- जोजोबा, बांबू, जेट्रोफा, पानपिंपरी, रबर, तेलताड, मसाला पिके, औषधी वनस्पती
कोरडवाहू फळपिके- आंबा, काजू, बोर, सिताफळ, चिंच, आवळा, फणस, कोकम, जांभूळ, कवठ.
बागायती फळपिके- नारळ, संत्रा, मोसंबी, चिक्कू, डाळिंब, पेरु, अंजीर, कागदी लिंबू, सुपारी.
इतर पिके- जोजोबा, बांबू, जेट्रोफा, पानपिंपरी, रबर, तेलताड, मसाला पिके, औषधी वनस्पती

No comments:
Post a Comment